
नांदगांव [ प्रतिनिधी ] अबीरगंध लेखसंग्रह हा साहित्य क्षेत्रातील साहेबराव नंदन तात्या लिखित वारकरी रत्न जयरामबाबा गोंडेगावकर यांच्या जिवनावरील अनोख्या विषयाला वाहिलेल्या, एका संताच्या जिवणावरचा दस्तावेज असून आजच्या घडीला व युवा पिढीला संस्कार संस्कृतीचा प्रेरणादायी विचारांचा अमुल्य ठेवा ठरेल असे विचार रामायणाचार्य ह.भ.प. अनंतजी वहाडणे महाराज यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केले. गेल्या अनेक दिवसापासून वारकरी संप्रदायात व साहित्य क्षेत्रात उत्सुकता लागून राहिलेल्या, व सर्वत्र चर्चित असेलेल्या, ह.भ.प. शांतीसागर जयरामबाबा गोंडेगावकर यांच्या जीवनावर आधारीत, ज्ञानसिंधु प्रकाशन प्रकाशित, गावगाडाकार साहेबराव नंदन तात्या लिखित १२ वी साहित्यकृती अबीरगंध ह्या लेखसंग्रहाचे नांदगाव तालुक्यातील गोंडेगाव येथे अंखड हरिणाम सप्ताहाच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या सांगता समारोहाच्या काल्याच्या महाप्रसादाच्या कार्यक्रमात भक्तिमय वातावरणात टाळमृंदगाच्या गजरात, जय जय राम कृष्ण हरी वासुदेव हरी नामोच्चारात अनेक संताच्या उपस्थितीत वयाचे ९६ वर्षाचे ह.भ.प. जयरामबाबा गोंडेगावकर यांच्या शुभहस्ते व श्री सिताराम पाटील रिंढे [ मा. पंचायत समिती सदस्य ] रामायणाचार्य ह.भ.प. श्री अनंतजी वहाडणे महाराज, श्री उत्तमराव निकम सरपंच चिकटगाव, राजेंद्र रिंढे, ह.भ.प. तुकाराम महाराज, आण्णासाहेब बोडखे, रमेश मोरे, गोरख जाधव, रामदास पाटील, संजय गवळीसर , दादासाहेब जाधव मा. सरपंच गोंडेगाव, कचरूभाऊ सरोवर, उपसरपंच गोंडेगाव, पांडूरंग जाधव, चंद्रकांत जाधव, लक्ष्मणराव जाधव, सुधीर होनराव शंकरराव मोरे, यांच्या उपस्थितीत थाटात प्रकाशन करण्यात आले. ह्या प्रसंगी गोंडेगाव व पंचक्रोशितील बहुसंख्य वारकरी संप्रदायाचे भाविकांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पिंपळनेरचे से. नि. उपप्राचार्य प्रा. डी. टी.पाटील होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून कृषीतज्ञ डॉ. साहेबराव क्षीरसागर, सगर सेवार्थी आर. जे. पाटील, सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील, सुधाकर साळवेसर, डॉ. शिवाजीराव गोरडे, एकनाथआण्णा साळवे, ललितभाऊ साळवे, संजीव अहिरे, भास्करराव पाटील, कन्हैयालाल चौधरी, आदि मान्यवर उपस्थित होते. पुस्तकाची गरज व निर्मिती या विषयावर प्रकाशक तान्हाजी खोडे यांनी आपले विचार मांडले, तर लेखक साहेबराव नंदन तात्या यांनी पुस्तकाची कुळकथा विषद केली. पुस्तका विषयी आर. जे. पाटील, अशोक पाटील सह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षिय भाषण ह.भ.प. प्रा . डॉ डी टी पाटील (बल्लक सर ) ताहाराबादकर बांबाचे शिष्य यांनी केले ते म्हणाले शांतीसागर जयराम बाबा एक थोर साधुपुरुष व विभूती आहेत गोडेंगावचे नाव महाराष्ट्रात त्यांच्यामुळे परीचीत झाले आहे कार्यक्रमाचे संपूर्ण यथोचित सुत्रसंचालन व आभार विलासराव सरोवर यांनी मानले. शेवटी महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
