
नाशिक ( प्रतिनिधी ) भारत निवडणूक आयोगाचे निदर्शनानुसार नजीकच्या कालावधीत मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला जाणार आहे. त्या दृष्टीने पूर्वतयारी चा भाग म्हणून ज्या मतदारसंघात सन 2024 मतदार यादी मध्ये समाविष्ट आहे. त्या मतदारांचे सन 2002 च्या मतदार यादी मध्ये नाव नाही, अशा मतदारसंघांच्या आई-वडील किंवा आजी आजोबा यांचे नावाचे सन 2002 च्या मतदार यादी मधील नावाची मॅपिंग करणे, तसेच ज्या मतदारांचे नाव सन 2024 च्या मतदार यादी मध्ये समाविष्ट आहे. परंतु त्या मतदारांची आई वडील किंवा आजी आजोबा यांचे नाव सन 2002 च्या मतदार यादीत नाही. अशा मतदारांच्या राहत्या ठिकाणी बी एल ओ हे प्रत्यक्ष सर्वे भेट देतील. त्यानंतर त्यांचे आई-वडील किंवा आजी-आजोबा यांचे मूळ रहिवासी असल्याच्या ठिकाणना बाबत माहिती घेतली (, त्यात राज्य, जिल्हा, तालुका, गाव) तसेच ज्या मुली लग्न होऊन आल्या आहेत व त्यांचे नाव सध्याच्या मतदार यादीत समाविष्ट आहे. त्यांच्या आई-वडिलांचे नाव सन 2002 मध्ये कोणत्या मतदारसंघात होते. याबाबत सुद्धा माहिती जाणून घेतील . आणि माहिती जाणून घेतल्यानंतर voters.eci.gov.ni या वेबसाईट वर जाऊन त्या मतदाराचे सन 2002 च्या मतदार यादी मॅपिंग करतील.
वरील प्रमाणे प्रक्रियेनुसार मतदार यांचे नाव मॅप झाले किंवा कसे याबाबतची खात्री करण्यासाठी नासिक जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर दिनांक 4/4/2026 रोजी सकाळी 9.00 वा.ते 2.00 वा.या कालावधीत मतदार यादी भागाचे मतदान केंद्र स्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत .तरी नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदारांना आवाहन करण्यात येत आहे की आपले मतदार यादीतील नाव वरील प्रमाणे प्रक्रियेनुसार मॅप झाले किंवा कसे याबाबत शनिवार दिनांक 4 एप्रिल 2016 रोजी स्वतः मतदान केंद्रावर जाऊन आपल्या बी एल ओ सी संपर्क साधून खात्री करून घ्यावी. सदर विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी आपण प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रसाद आयुष नाशिक यांच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.
