
ओझर: (वार्ताहर) येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात हनुमान जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी केले. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग पुरातत्त्व व वस्तू संग्रहालयाचे संचालनालय शिवशास्त्र शौर्यगाथा या मराठा व समकालीन शस्त्राचे फिरते संग्रहालय मुंबई या बसमधील वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन मा खासदार भास्करराव भगरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी खासदार भगरे यांनी सांस्कृतिक वस्तू संग्रहालयातील माहितीचा उपयोग सर्व विद्यार्थ्यांना घ्यावा असे आवाहन केले. यावेळी व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश महाले मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे वडनेर भैरवचे मुख्याध्यापक श्री.मते, प्रा शेजवळ, प्रभाकर लवांड महेंद्र डांगळे, नरेंद्र डेरले, हेमंत भट पुरातत्त्व विभागाचे सेवक नागेश्वर करवंदे शुभम बोबस्कर धीरज सोळसे प्रफुल बनकर विकास लहाने रेखा देशमाने मंगल सावंत शकुंतला आगळे संगीता भदाणे संगीता शेटे सरोज खालकर सविता पवार उज्वला जाधव कीर्ती बच्छाव मनोरमा सोमवंशी संगीता सोनावणे मेघा शेजवळ तृप्ती शिंदे सुप्रिया भंडारे सोनल माळोदे आदी शिक्षक उपस्थित होते.फलकलेखन सविता पवार यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक नरेंद्र डेरले यांनी केले. आभार शिक्षक आत्माराम शिंदे यांनी मानले.

