
खेडले झुंगे ( प्रतिनिधी)– खेडले झुंगे येथे अद्वितीय सोहळा….हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर खेडले झुंगे येथे एक अनोखा आणि भक्तिमय सोहळा अनुभवायला मिळणार आहे. श्री गुरुवर्य योगिराज तुकाराम बाबा खेडलेकर संस्थानतर्फे, गुरुवर्य रघुनाथ बाबा खेडलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य हनुमान चालीसा पाठ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे तुकाराम बाबा खेडलेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गुरुवर्य तुकाराम बाबा गुरुकुल खेडले झुंगे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तब्बल ११११ विद्यार्थी एकाच वेळी सामूहिक हनुमान चालीसा पठण करणार आहेत.विशेष म्हणजे, हा दिव्य नाद अभयवरद १११ फूट उंच हनुमान मूर्तीसमोर गुंजणार असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून जाणार आहे. हजारो कंठातून उमटणारा हनुमान चालीसेचा जयघोष हा प्रत्येक भक्तासाठी एक अविस्मरणीय आणि ऊर्जादायी अनुभव ठरणार आहे.हा भव्य सोहळा बुधवार, दि. २ एप्रिल (हनुमान जयंती) रोजी सकाळी ८:३० ते ९:३० या वेळेत पार पडणार आहे.तरी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अद्वितीय भक्तिसोहळ्याचा प्रत्यक्ष साक्षीदार व्हावे आणि हनुमंताच्या कृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा, असे उत्साहपूर्ण आवाहन संस्थानतर्फे करण्यात येत आहे.
