
नाशिक ( प्रतिनिधी)नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर संस्थेतील अन्यायग्रस्त शिक्षकांनी आजपासून आमरण उपोषण आंदोलन सुरू केले होते. शिक्षकांच्या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर सेना संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजय चव्हाण यांनी पाठिंबा जाहीर केला.. व मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस मा ऍडव्होकेट नितीन ठाकरे यांच्याशी शिक्षकांच्या मागण्यांवर प्रत्यक्ष चर्चा केली.. यावेळी संस्थेने पंधरा दिवसाची मुदत मागितली. याबाबत आंदोलकांना समजावून सांगून संजय चव्हाण यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण पंधरा दिवसांसाठी स्थगित करण्यात आले यावेळी शिक्षकेतर शिक्षक शिक्षकेतर सेनेचे नाशिक महानगर सचिव विनोद हिरे, राजेंद्र सोमवंशी उपस्थित होते.
