
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२२६ वा दिवस
बरेच लोक स्वतः खूप अज्ञानी असतात पण अहंकारामुळे ते स्वतःला सर्वज्ञ व सर्वश्रेष्ठ समजतात. एवढेच नाही तर अतिआत्मविश्वासाने दुसऱ्यालाही आपल्या खांद्यावर घेऊन जाण्याची तयारी दर्शवतात. अशा प्रकारे एखादा अंध सर्व अंधांचे नेतृत्व करण्याच्या नादात सर्वांना मोठ्या खड्ड्यात पडतो. माझ्यावर कोणीतरी अवलंबून आहे किंवा मी कुणाचे तरी भले करू शकतो असा विचार करणेच अत्यंत दुबळेपणाचे लक्षण आहे. अहंकार हेच सगळ्या असक्तीचे मूळ आहे आणि याच आसक्तीमुळे सर्व दुःखांची निर्मिती होते. आपण आपल्या मनाला हे चांगल्या प्रकारे समजून सांगितले पाहिजे की या जगात कोणीच आपल्यावर अवलंबून नाही. आपण केवळ एक साधन आहोत साध्य नाही.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर चैत्र १० शके १९४८
★ चैत्र शुद्ध /शुक्ल १३
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८३
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. ३१ मार्च २०२६
★ भगवान महावीर जयंती
★ १७२७ गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारे इंग्लिश शास्त्रज्ञ व तत्वज्ञ सर आयझॅक न्यूटन यांचा स्मृतिदिन.
★ १८६५ भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा जन्मदिवस.
