
लेखक – शंकर नामदेव गच्चे नांदेड मोबाईल नंबर -८२७५३९०४१०

भगवान महावीर यांचा जीवन परिचय जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर अहिंसेचे मूर्तिमंत प्रतिक होते. वैशाली राज्याच्या कुंडलपूर येथे इसवी सन पूर्व ५९९ मध्ये म्हणजेच सहाव्या शतकात त्यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव सिद्धार्थ तर आईचे नाव त्रिशला होते.पत्नीचे नाव यशोदा होते.त्यांना एक मुलगी झाली होती तीचे नाव प्रियदर्शना होते.
भगवान वर्धमान यांच्या भावाचे नाव नंदिवर्धन तर बहिणीचे नाव सुदर्शना होते. त्यांचे बालपण राजेशाही थाटात गेले. आठ वर्षांचे असताना त्यांना शिक्षण व शस्त्रविद्येचे ज्ञान घेण्यासाठी शाळेत पाठविण्यात आले.
श्वेतांबर पंथाच्या म्हणण्यानुसार भगवान वर्धमान यांनी यशोदा यांच्याशी विवाह केला होता, तर दिगंबर पंथाच्या म्हणण्यानुसार त्यांनी विवाह केला नसून ते ब्रम्हचारी होते. महावीरांचे कुटुंबीय जैनांचे तेवीसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे अनुयायी होते.
भगवान महावीर २८ वर्षांचे असताना त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी श्रामणी दीक्षा घेतली. त्यानंतर बहुतांश वेळ ते ध्यानात मग्न असत. काही दिवसांनी त्यांनी पूर्ण आत्मज्ञान झाले. त्यांनी बारा वर्षांपर्यंत मौन पाळले होते. हटयोग्याप्रमाणे त्यांनी शरीराला खूप कष्ट दिले.
शेवटी त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी जनकल्याणासाठी उपदेश देण्यास सुरवात केली. त्यासाठी त्यांनी त्यावेळी लोकांमध्ये प्रचलित असलेल्या अर्धमागधी भाषेचा आधार घेतला. इंद्रिय व विषय वासनांचे सुख दुसर्याला दुःख देऊनच मिळवता येते, असे त्यांचे मत होते. महावीर स्वामी अहिंसाचे प्रतीक होते. त्यांनी ‘जगा आणि जगू द्या ‘ हा संदेश संपूर्ण जगाला दिला.कोणत्याही माणसाला आनंद बाहेरून आणता येत नाही. शांतता आणि आत्मसंयमात खरी अहिंसा आहे.प्रत्येक जीवंत प्राण्यावर दया करणे म्हणजेच अहिंसा होय. द्वेषामुळेच माणसाचा नाश होतो.स्वतःच्या दोषांमुळे सर्व मानव दु: खी आहेत आणि स्वतःच्या चुका सुधारून प्रत्येक माणुस आनंदी आणि सुखी होऊ शकतो.महावीर म्हणतात की स्वत: ला जिंकणे म्हणजे लाखो शत्रूंवर विजय मिळवणे होय.माणवाचे खरे शत्रू आहेत – लोभ, द्वेष, क्रोध, गर्व आणि आसक्ती जैन धर्माचे पाच मूलभूत तत्त्व त्यांचे आध्यात्मिक दृष्टीकोन आपण जाणून घेऊ १)अहिंसा:
भगवान महावीर म्हणतात जीवनाचे पहीले मूलभूत तत्त्व आहे अहींसा.अहिंसा परमो धर्म’.अहींसेचे तीन अंग आहेत.
अ) कायिक अहिंसा (शरीराकडून होणारी): यात आपण कोणत्याही प्राण्याला जाणते अजाणतेपणे आपल्या शरीराकडून हानी पोहोचवू नये. मानवाकडे अफाट सामर्थ्य आहे.तो त्याच्या बळावर इतरांना दुःखापासून वाचवू शकतो.
ब) मानसिक अहिंसा ( अनिष्ठ विचार ): कोणत्याही प्राण्यांविषयी हानिकारक, वाईट विचार न करणे. कोणाच्या भावना दुखावतील असे शब्द न बोलणे.कारण तथागत बुध्द म्हणतात”वादाने माणसे दूर जातात शब्दाने बाणापेक्षा तीव्र जखमा होतात.” C] बौद्धिक हिंसा (द्वेष न करणे ) आपल्या मनातील व्यक्ती,वस्तू परिस्थिती यांविषयी कोणत्याही प्रकारचा द्वेष असता कामा नये. द्वेषाची ही भावनाच आपल्या मनामध्ये अशांती, असंतुलन आणि असमंजसपणा निर्माण करते. जीवनातील व्यक्ती,वस्तू,परिस्थिती दूर करायची नाही तर त्यांच्या विषयीची द्वेष भावना संपवायची आहे.२) सत्य – भगवान महावीर आम्हाला नेहमी खरे बोलण्याची प्रेरणा देतात सत्याची कसोटी
१) योग्य आणि अयोग्य
गोष्टीमधून योग्य गोष्टीची निवड करणे.२) शाश्वत आणि क्षणभंगुर गोष्टी मधून शाश्वत व चिरंतन गोष्टीची निवड करणे ३) अचौर्य (चोरी न करणे ) याचा अर्थ इतरांच्या कोणत्याही गोष्टी,वस्तू न चोरने.असा अर्थ भगवान महावीरांना अपेक्षित नाही.तर शरीर – मन-बुध्दि यानां मी पणाच्या अहंकारात न गुंतवणे.शरीर मन बुद्धी ही केवळ साधने आहेत.यांना सोडून परम्यात्म्याला आपले मानने म्हणजे अचौर्य होय. ४)ब्रह्मचर्य
हे तत्त्व वरील ३ तत्त्वांचे मूळ आहे. – अहिंसा, सत्य आणि अचौर्य.याचा अर्थ, ‘ब्रह्मा + चर्य अर्थात ब्रह्मा (चेतना)मध्ये स्थिर राहणे हा आहे.जेव्हा आपणाला आपल्या शरीराचा मोह राहत नाही.तेव्हा कोणत्याही शरीरास भोगण्याची तृष्णा समाप्त होते.यालाच ब्रर्हमचर्य म्हणतात.५) अपरिग्मनावर
शरीर-मन-बुध्दीला आपले न मानता जीवन व्यतीत करतो त्याची दिनचर्या संयमित असते.अपरिग्रहाचे खालील तीन अंग आहेत.१) वस्तूंचा अपरिग्रह- यामध्ये क्षणिक सांसारीक वस्तूंचा मोह सुटतो.वस्तू उपलब्ध असताना आणि उपलब्ध नसताना मनाची स्थितप्रज्ञता ढळत नाही.त्यामुळे माणूस दुःखी ,कष्टी होत नाही. नाही. २)लोक अपरिग्रह: जगामध्ये लोक येतात; आपली भूमिका बजावतात आणि निघून जातात. ज्या व्यक्तीला हे सत्य माहीत आहे, तो या कायद्याच्या पलीकडे जातो. तो गर्दीत राहो कींवा एकांतात नेहमी प्रसन्न, आनंदी आणि शांत असतो. कारण त्याची शांती आणि आनंद बाह्य जगापासून आलेला नाही तर त्याच्या आतून आलेला असतो.३) विचारांचा अपरिग्रह : सर्वांच्या मतांचा आदर करणे. त्यांच्या मते कोणताही विचार परीपूर्ण नसतो. विचारांच्या पलिकडेच जाऊन आपण अनुभव घेतला पाहिजे.
त्यामुळेच त्यांनी जैन धर्माच्या अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह या बाबींमध्ये ब्रम्हचर्याचाही समावेश केला. त्याग, संयम, प्रेम, करूणा, शील व सदाचार हे त्यांच्या प्रवचनाचे सार आहे. त्यांनी चतुर्विध संघाची स्थापना करून समता हेच जीवनाचे लक्ष्य असल्याचे सांगितले.
देशात ठिकठिकाणी फिरून महावीरांनी पवित्र संदेशाचा प्रसार केला. इसवी सन पूर्व ५२७ मध्ये बिहार येथील पावापुरी येथे वयाच्या बाहत्तराव्या वर्षी त्यांचे निर्वाण झाले. तो दिवस होता कार्तिक कृष्ण अमावस्येचा. भगवान महावीरांनी जैन धर्माचा प्रचार आणि प्रसार केला.पण जैन धर्माची तत्वे फार कठीण आणि कठोर असल्यामुळे तो धर्म भारताच्या बाहेर जाऊ शकला नाही.याऊलट महावीरांच्या समकालीन असलेल्या तथागत गौतम बुध्दाच्या धम्माची तत्त्वे सुलभ सोपी आणि आचरणात आणणे सोपे आसल्यामुळे तो जगात ४० देशात जाऊन पोहचला. तरीही जैन धर्म व बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानात खुप मोठ्या प्रमाणावर साम्य आहे.महावीरांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
