
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२२४ वा दिवस
अगदी लहानपणापासूनच करुणात्मक, बलदायक, विधायक, रचनात्मक असे प्रेरणादायी व उपयुक्त विचार लोकांच्या मेंदूत शिरू द्या. लोकांना बालपणापासून शिकवा की ते सारेच अमृताचे महिमाशाली पुत्र आहेत. असल्यास विचारांचा प्रभाव स्वतःवर व इतरांवर सातत्याने पडू द्या. दुबळेपणा आणतील, पंगू बनवतील अशा विचारांना कुठलाही थारा देऊ नका. आपल्या मनाशी एकच दृढनिश्चय करा की मी तोच आहे, मी तोच आहे. मी आत्मा आहे. मी परमात्म्याचा अंश आहे, मी सर्वश्रेष्ठ आहे. तुमच्या हृदयात हेच अहर्निश एखाद्या संगीतासारखे झंकृत होत राहो. अगदी मृत्यूसमही देखील सोऽहं सोऽहं असा जयघोष सतत होत राहो.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर चैत्र ९ शके १९४८
★ चैत्र शुद्ध /शुक्ल १२
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८३
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. ३० मार्च २०२६
★ १६६५ पुरंदर किल्ल्याला वेढा घालणाऱ्या दिलेरखानाशी झुंज देताना मुरारबाजी धारातीर्थी पडले.
★ १९४२ भाषातज्ज्ञ, कोशकार, लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके यांचा जन्मदिन
★ १९७६ विख्यात चित्रकार, रंगसम्राट रघुवीर शंकर मुळगावकर यांचा स्मृतीदिन.
