
नांदगाव (प्रतिनिधी ) दिनांक 27/03/2026 रोजी मा.नगराध्यक्ष सागर भाऊ हिरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त नांदगाव नगरपरिषद नांदगाव संचलित स्री शक्ती शहर स्तर संघ (CLF)अंतर्गत PMFME(खाद्य पदार्थ )या योजनेअंतर्गत 3 बचत गटांना सप्तश्रृंगी,मुक्ता,संग्राम असे प्रती 4 लाख याप्रमाणे कर्ज मंजूर करून माननीय नगरअध्यक्ष सागर भाऊ हिरे ,महिला व बालकल्याण सभापती एडवोकेट विद्याताई कसबे नांदगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय जाधव साहेब यांच्या हस्ते उपस्थित महिला बचत गटांना चेक वाटप करण्यात आले

. याप्रसंगी सहायक प्रकल्प अधिकारी महिरे सर,समुदाय संघटक,आहेर मॅडम,CLF अध्यक्षा, बेलदार ताई,उपाध्यक्ष, तैमीना दीदी CLF व्यवस्थापक,गंगावणे मॅडम,CRP शिदे मॅडम, परदेशी मॅडम, काकळीज मॅडम तसेच शिवसेना महिला आघाडीच्या नेहा कोळगे ,जया जगताप ,विजया चतुर, माया अहिरे ,कल्पना सुरवाडे ,नैन खटके व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

