
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२२३ वा दिवस
सुसंस्कृत आणि सुशिक्षित माणसांना चिंतन, तत्त्वज्ञान, कला, विज्ञान इत्यादीकांतच आनंद लाभत असतो. अध्यात्म तर आणखी वरच्या पातळीवरील गोष्ट आहे. त्याचा विषय अनंत हा असल्यामुळे त्याची पातळी सर्वात वरची आहे, आणि ज्यांना त्याचा आस्वाद घेतां येणें शक्य आहे त्यांच्यापक्षी तेथे सर्वात अधिक आनंद आहे. म्हणून, माणसाने सुखाच्या शोधांत असलें पाहिजे या उपयुक्ततावाद्यांच्याच ब्रीदानुसार वागावयाचे झाले तरी-देखील आपण धार्मिक चिंतनाची सवय लावून घेतली पाहिजे, कारण उपलब्ध सर्व सुखांमध्ये तेच सर्वात उच्च सुख होय.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर चैत्र ७ शके १९४८
★ चैत्र शुद्ध /शुक्ल १०
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८३
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. २८ मार्च २०२६
★ १७३७ थोरले बाजीराव पेशवे यांनी दिल्लीवर स्वारी करुन मोगलांचा पराभव केला, दिल्लीत मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले.
★ १९२५ मराठी सुप्रसिध्द अभिनेते राजा गोसावी यांचा जन्मदिन.
★ १९९२ जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू स्थानकवासी आचार्य सम्राट आनंद ऋषीजी यांचा स्मृतीदिन.
