
.पिंपरखेड -( प्रतिनिधी )येथील कै.पुंडलिक पांडूरंग मवाळ विद्यालयात किशोरवयीन मुलींना आज रोजी मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर येथील पी. एच. सी. चे डॉ. अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. जुन्नरे मॅडम यांनी सखोल मार्गदर्शन केले. मुलींच्या विविध प्रश्नांवर त्यांनी चर्चेच्या माध्यमातून समाधानकारक उत्तरे दिली. मुलींच्या समस्यांवर उपाय सुचवले.

एकूण ८५ किशोरवयीन मुलींना मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. यावेळी विद्यालयाच्या वतीने डॉ. जुन्नरे मॅडम यांचा व सहकाऱ्यांचा शॉल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती अलका शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक काशिनाथ गवळी, जेष्ठ शिक्षक संजय कांदळकर, कैलास पठाडे, लक्ष्मण जाधव, उत्तम सोनवणे, संदीप मवाळ, निलेश चव्हाण, आबा सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

