
सायखेडा ( प्रतिनिधी) शुक्रवार दिनांक २०/३/२०२६ रोजी मविप्र समाज संचलित जनता इंग्लिश स्कूल सायखेडा विद्यालयास समकालीन प्रकाशन संस्था व पुण्यभूषण फॉऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देणगीदार श्री सुधीर जोशी यांचेकडून १० हजार रुपये किमतीची पुस्तके विद्यार्थी व शिक्षक यांचेसाठी विद्यालयास प्राप्त झाली. सदर संस्था मागील 33 वर्षापासून प्रकाशन क्षेत्रात कार्यरत असून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी व विद्यार्थांना मोबाईल टिव्ही पासून दूर ठेवणे हा उदात्त हेतू या संस्थेचा आहे. सदर पुस्तके देणगी रुपाने मिळवून देण्यासाठी श्रीमती सारिका कळसकर( जागर प्रकल्प) समन्वयक समकालीन प्रकाशन, तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री आर.व्हि.वाजे यांनी विशेष प्रयत्न केले. सदर पुस्तके आज विद्यालयास प्राप्त झाली.या पुस्तकांचा स्विकार विद्यालयाचे प्राचार्य श्री आर व्हि वाजे, उपमुख्याध्यापिका श्रीमती अलका आहिरे, पर्यवेक्षक श्री सोमनाथ पगार यांचे हस्ते ग्रंथालयाचे ग्रंथपाल श्री बी. टी. धनवटे यांनी केला. याप्रसंगी बोलताना मा.प्राचार्य यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांना ही पुस्तके वाचण्याचे आवाहन केले व सगळ्यांनी वाचनसंस्कृती जोपासण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले. तसेच देणगी रुपाने १० हजार रुपये किंमतीची पुस्तके दिल्याबद्दल देणगीदार श्री सुधीर जोशी व श्रीमती कळसकर मॅडम यांचे आभार मानले व मविप्र संस्थेच्या वतीने ऋण व्यक्त केले .यावेळी मंचावर विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,विद्यार्थीनी उपस्थित होते.
