
हिमायतनगर प्रतिनिधी शेख मुजम्मील
हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबुराव कदम कोळेकर यांच्या मार्गदर्शनातून मुस्लिम समाजासाठी असलेला पवित्र महिना रमजान या महिन्यामध्ये सर्व मुस्लिम बांधव हे रोजा धरतात याचेच औचित्य साधून उद्या दिनांक १९ मार्च २०२५ रोजी हिमायतनगर शहरातील जुनी दारूल उलूम मोहम्मदिया आणि सध्याची मदिना मस्जिद येथे भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या इफ्तार पार्टी मध्ये हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबुराव कदम कोळेकर हेही उपस्थित राहणार आहेत तरी हिमायतनगर तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांना आणि राजकीय सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना असे आवाहन करण्यात येते की या इफ्तार पार्टीसाठी सर्वांनी उपस्थित राहावे.
अवाहन कर्ते हिमायतनगर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अफरोज भाई वीरसणीकर
