
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२१४ वा दिवस
पावित्र्याच्या तेजाने तळपणारे, ईश्वरावरील श्रद्धेचे शुभकवच ल्यालेले, मृगेंद्राचे सामर्थ्य नसानसांत स्फुरत असलेले, दीनदलितांबद्दल हृदयात अपार करुणा असलेले सहस्रों युवक-युवती हिमाचलापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र संचार करतील, मुक्ती, सेवा आणि सामाजिक उत्थानाचे आणि सर्वप्रकारच्या समानतेचे आवाहन करतील आणि हा देश पौरुषाने मुसमुसून उठेल !
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर फाल्गुन २७ शके १९४७
★ चैत्र शुद्ध /शुक्ल प्रतिपदा
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८३
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. १९ मार्च २०२६
★ ‘गुढीपाडवा’ चैत्र नवरात्र प्रारंभ
★ अभ्यंगस्तान संवत्सरारंभ
॥ वन्दे संस्कृतमातरम् ॥
हरिः ॐ सर्वेभ्यो नूतन संवत्सर- शुभाशयाः॥
★ १८८४ आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचा स्मृतीदिन
★ १९८२ स्वातंत्र्य सेनानी, गांधीवादी, समाजवादी, पर्यावरणवादी नेते, भारतीय काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आचार्य जीवटराम भगवानदास कृपलानी यांचा स्मृतीदिन
★ १९९८ केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते इ. एम. एस. नंबूद्रीपाद यांचा स्मृतीदिन.
★ वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती, नव्या वर्षी नव्या भेटी, नव्या क्षणांची नवी नाती, नवी पहाट तुमच्यासाठी, शुभेच्छांची गाणी गाती. हिंदू नववर्ष तथा गुढीपाडव्याच्या सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा. 🚩🚩🚩🚩
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
