
नाशिक ( प्रतिनिधी): नवकवी मंच, नाशिक यांच्या वतीने ‘कवितेस नाव अपुल्या’ या काव्य पर्वणीचे १९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम IMRT हॉल, KTHM कॉलेज येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमात कवी विनोद बैरागी (लक्ष्मीनातू), सुमित फोपसे व जीवन कुंदे हे आपल्या स्वरचित मराठी व हिंदी कवितांचे सादरीकरण करणार आहेत. कार्यक्रमासाठी संगीत संयोजन कमलेश धुमाळ यांचे असून सूत्रसंचालन योगेश कड करणार आहेत.
साहित्यप्रेमी व रसिकांनी या काव्य पर्वणीस उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
