
सौं गायत्री संदीप गवारे हिला जेष्ठ साहित्यिक सुहास टिपरे यांचे शुभ हस्ते पुरस्कार प्रदान झाला या प्रसंगी व्यासपीठावर सुशील कुमार शिंदे आयोजक, श्री बाळासाहेब गायकवाड संभाजी नगर, वैशाली ताई सोनवणे जेष्ठ कवियत्री सटाणा व डॉक्टर प्रदीप कुमार कळस्कर कवी जळगाव व सुनील शिरसाठ कवी ठाणे हे उपस्थित होते. गायत्री संदीप गवारे हीचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.
नासिक ( प्रतिनिधी)= साहित्य रंग साहित्य मंच आयोजित जल्लोष साहित्याचा 26 या महोत्सव मध्ये कवियत्री व गायिका सौं गायत्री संदीप गवारे हिने तिहेरी सु यश प्राप्त केलें आहे. स्वर्गीय विमल हरिश्चंद्र टिपरे स्मरणार्थ गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक, काव्य स्पर्धेत उत्तेजनार्थ व रावसाहेब घोडेराव यांच्या वतीने घेण्यात आलेल्या काव्य स्पर्धेत तृतीय क्रमांक चा पुरस्कार सौं गायत्री गवारे हिला प्राप्त झाला आहे. राणी भवन येथे 15 मार्च रोजी झालेल्या साहित्य महोत्सव तील यशा बद्दल नासिक मधील मान्यवर यांनी सौं गायत्री संदीप गवारे हिचे अभिनंदन केलें आहे. याच कार्यक्रम मध्ये सौं गायत्री गवारे हिने उत्कृष्ट सूत्रसंचालन करून उपस्थित रसिक कवी यांची मने जिंकली.
