
विंचूर दि.१५ (प्रतिनिधी) येथील मातोश्री कै.हौसाबाई वामनशेठ दुसाने महिला ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था, न्यू ब्लॉसम्स इंग्लिश मीडियम स्कूल व समर्थ विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित आरोग्य व आहार मार्गदर्शन चर्चासत्र उत्साहात संपन्न झाले.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून व ग्रामिण भागातील महिलांमध्ये आरोग्या विषयी जागरूकता निर्माण करुन नारीशक्ती सशक्त बनविणे या उदात्त हेतूने न्यू ब्लॉसम्स् इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रांगणात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातोश्री हौसाबाई दुसाने महिला पतसंस्थेच्या चेअरमन वैशाली दुसाने या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून येवला येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ महेश्वर तगारे,न्यू ब्लॉसम्स् चे अध्यक्ष अँड संजय दरेकर, सचिव अविनाश दुसाने, मातोश्री महिला पतसंस्थेच्या व्हा.चेअरमन ज्योती शिरसाट या होत्या. प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी डॉ तगारे यांनी महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी संतुलित आहाराचे महत्व दैनंदिन जीवनातील योग्य आहार पद्धती आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. तर शिक्षिका श्वेता सावंत यांनी महिला दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले.तसेच निकीता मंडलिक यांनी मातोश्री हौसाबाई दुसाने महिला पतसंस्थेच्या विविध योजनांची माहिती दिली.व महिलांना संस्थेत आर्थिक व्यवहार व गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

दरम्यान महिलांसाठी आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या सोनाली नेवगे यांना वुमन ऑफ द डे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी महिलांनी इंप्रोवर्ड वुमन इंप्रोवर द वर्ल्ड अशा घोषणा दिल्या.याप्रसंगी मातोश्री हौसाबाई दुसाने महिला पतसंस्थेच्या संचालिका ताराबाई क्षीरसागर, ज्योती कानडे, योगिता गाडे, स्मिता खांदोडे,वनिता गांगुर्डे, व्यवस्थापक ऋषिकेश जोशी, न्यू ब्लॉसम्स् च्या प्राचार्या ज्योती माठा, समर्थ प्राथमिकच्या मुख्याध्यापिका पूजा निकम, समन्वयक संगीता जगताप आदींसह शाळेच्या शिक्षिका व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका आरती गावकर यांनी केले.
