
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी शेख मुजम्मील
मुस्लिम युवा टायगर सेना संघटनेची नवी कार्यकारणी जाहीर या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेख इस्माईल पत्रकार यांनी रमजान ईद चे औचित्य साधून नवीन कार्य करणे जाहीर केले या प्रसंगी शेख खाली येऊन शेख मेहबूब यांची मराठवाडा मध्ये अध्यक्षपदी तर शेख मुजम्मील शेख नजीर यांची नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी याचबरोबर शेख युसुफ शेख मेहबूब यांची हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली,
या निवडीनंतर मुस्लिम युवा टायगर सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेख इस्माईल यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व याप्रसंगी बोलताना शेख इस्माईल पत्रकार यांनी अशी माहिती दिली की या संघटनेचा वापर फक्त आणि फक्त गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी व सामाजिक कार्यासाठी वापर करण्यात यावा आणि यापुढे सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी व सामाजिक कार्य करण्यासाठी व संपूर्ण देशात सलोखा निर्माण करण्यासाठी तत्पर राहू अशी ग्वाही याप्रसंगी स्लिम युवा टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष इस्माईल पत्रकार व मराठवाडा प्रदेश अध्यक्ष शेख खय्युम कुरेशी यांनी दिली
