
आज दि. १२ मार्च रोजी विद्यालयात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षण मंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर श्री ए. पी. सोनवणे सर यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे आपले विचार मांडले. सार्थक दौंड ,लतिका घोटेकर, यामिनी चव्हाण आणि गुंजिता ठाकरे या इयत्ता 5 वी च्या विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनकार्य व त्यांच्या देशसेवेबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत विद्यालयाचे उपमुख्याध्यापक माननीय डॉ. श्री जोगेश्वर नांदुरकर यांनी व्यक्त केले. त्यांनी महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या विकासामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान तसेच शिक्षण ,उद्योग सहकार क्षेत्रातील यशवंतराव चव्हाण यांचे योगदान याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली..या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता दीपक बागुल हिने उत्कृष्टरीत्या केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी स्वरा पांडे हिने आभार प्रदर्शन केले.मंचावर कार्यक्रमास अकॅडमिक बोर्ड सदस्य श्री मधे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री दाभाडे सर, श्री काकळीज सर आणि श्री सोनवणे सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे फोटो मा. श्री दाभाडे सर यांनी काढले..कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता 5 वी चे वर्गशिक्षक श्री ए.पी.सोनवणे सर व श्रीमती एन.डी.सांगळे मॅडम यांनी केले..अशा प्रकारे महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
