
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२०७ वा दिवस
स्वार्थाचा अंकुर मनात निर्माण होण्यापूर्वीच खुडून टाका, अशी शिकवण कर्मयोग देतो. त्याच्यावर विजय मिळविण्याची क्षमता तुमच्यात आल्यानंतर मनाला तिथेच आडवा. स्वार्थाच्या या लाटेत वाहून जाण्यापासून मनाला थांबवा. मग तुम्ही या जगात जिथे वाटेल तिथे जाऊ शकतात. जे वाटेल ते करु शकतात. आपल्यातील अहंभाव आधी नाहीसा करा आणि मग सर्व जगाला आत्मस्वरूपात पहा. निस्वार्थ कर्माच्या मदतीने मानवी जीवनातील सर्वोच्च ध्येय असलेली मुक्ती मिळविणे हाच कर्मयोग आहे. त्यामुळे प्रत्येक स्वार्थी कार्य अडचणी निर्माण करतात, तर प्रत्येक निस्वार्थ कार्य आपल्याला पुढे पुढे नेत असते वेद देखील आपल्याला हीच शिकवण देतात की आपणच आपल्या भाग्याचे निर्माते आहोत.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर फाल्गुन २१ शके १९४७
★ फाल्गुन वद्य /कृष्ण ९
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. १२ मार्च २०२६
★ १९१३ भारताचे पाचवे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिन
★ १९३० महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी साबरमती पासून २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली.
★ १९९९ नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
