नॅशनल अस्सेसरांकडून विविध विभागांची सखोल पाहणी; सेवा सुधारण्यासाठी मार्गदर्शक सूचना

हिमायतनगर (प्रतिनिधी ): येथील ग्रामीण रुग्णालयात मंगळवार दि. १० मार्च २०२६ रोजी राज्यस्तरीय गुणवत्ता आश्वासन मापक (NQAS – National Quality Assurance Standards) कार्यक्रमांतर्गत समितीने भेट देत रुग्णालयाच्या कामकाजाची सखोल तपासणी केली. या तपासणीमध्ये रुग्णालयातील सेवा, व्यवस्थापन, स्वच्छता, तांत्रिक सुविधा तसेच दप्तर तपासणी यांचा बारकाईने आढावा घेण्यात आला.
मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. नॅशनल अस्सेसर डॉ. अश्विनी वाघे (नागपूर) व डॉ. प्रियंका साबळे (कोल्हापूर) यांनी रुग्णालयातील विविध विभागांना भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये ओपीडी, आयपीडी, प्रसूती विभाग, प्रयोगशाळा, एक्स-रे विभाग, औषध साठा, नोंदवही व तांत्रिक बाबींची पूर्तता याची तपासणी करण्यात आली.
यावेळी रुग्णालयातील स्वच्छता, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा, व्यवस्थापन पद्धती तसेच वैद्यकीय नोंदी यांचे परीक्षण करण्यात आले. तपासणीनंतर अस्सेसरांनी सेवा अधिक परिणामकारक व दर्जेदार करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना दिल्या.
या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास वानखेडे यांनी ग्रामीण रुग्णालयातील कामकाज, उपलब्ध सुविधा आणि रुग्णसेवेबाबत सविस्तर माहिती दिली. तर डॉ. शिवशंकर बुरकुले यांनी पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे रुग्णालयाच्या विविध उपक्रमांची आणि गुणवत्ता मानकांच्या पूर्ततेची माहिती समितीसमोर मांडली.
या संपूर्ण प्रक्रियेत जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. गुडे, डॉ. लोखंडे, डॉ. तिवारी मॅडम आणि डॉ. रुबी मॅडम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
तसेच रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, दंत शल्य चिकित्सक, इन्चार्ज सिस्टर, अधीपरिचारिका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकारी, क्ष-किरण तंत्रज्ञ अधिकारी, सहाय्यक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक संतोष हरिभाऊ मामीडवार, कनिष्ठ लिपिक धर्मपाल पाटील तसेच वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचाऱ्यांनी या प्रक्रियेसाठी विशेष परिश्रम घेतले.
या तपासणीमुळे ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेवा अधिक दर्जेदार व परिणामकारक करण्यासाठी मदत होणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
बॉक्स न्यूज :
NQAS म्हणजे काय?
नॅशनल क्वालिटी अॅश्युरन्स स्टँडर्ड (NQAS) ही केंद्र सरकारची योजना असून सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णसेवेचा दर्जा उंचावणे, स्वच्छता, व्यवस्थापन आणि तांत्रिक सुविधा सुधारणा करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नियमित तपासणीद्वारे रुग्णालयांची गुण
