
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२०६ वा दिवस
शरीराच्या माध्यमातून शक्तीच्या लहान-सहान प्रमाणात होणाऱ्या अभिव्यक्तीला कार्य म्हणतात, विचाराशिवाय किंवा चिंतनाशिवाय कोणतेच कार्य होऊ शकत नाही, डोक्यात उच्च दर्जाचे विचार व आदर्श भरून घ्या आणि त्यांना दिवस-रात्र डोळ्यासमोर ठेवा, मनात ठेवा, असे झाल्यावर याच विचारांनी मोठ-मोठे कार्य होतील. मला योजनांवर जास्त चर्चा करणे आवडत नाही तर मी माझ्या योजनांच्या विषयावर चर्चा करण्याऐवजी काही करून दाखवू इच्छितो. कोणत्याही महान आदर्शाच्या मागे लागण्यातच जीवनाची सार्थकता आहे. भारतात यावेळी करण्यायोग्य हेच मोठे काम आहे. लोखंड गरम असूनही त्यावर हातोडा मारण्याच्या या शुभ मुहूर्ताला मी हातातून जाऊ दिले तर माझ्याकडून हे महामूर्खतेचे काम होईल.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर फाल्गुन २० शके १९४७
★ फाल्गुन वद्य /कृष्ण ८
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. ११ मार्च २०२६
★ १६८९ हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन.
★ १८६३ बडोदा संस्थानचे महाराज, मालेगाव तालुक्यातील कौळाणे निं. चे भूमिपुत्र सयाजीराव गायकवाड यांची जयंतीदिन.
