
लेखक:- डॉ.गोरखनाथ सुकदेव देवरे
रिटायर्ड मेडिकल ॴॅफिसर ,स्वामी विवेकानंद नगर,येवला रोड, नांदगाव जि.नाशिक

॥आत्मा मालिक।गुरु ओम् गुरु ओम्॥ हरिपाठ चिंतन अभंग क्रमांक-१४
नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी । कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥१॥ रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप । पापाचे कळप पळती पुढें ॥२॥ हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तयां मोक्ष ॥३॥
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निज स्थान ॥ ४ ॥ [14]
अखंड सत्य व अमीत, असीम अशा हरीचे, ईश्वराचे जो स्मरण करतो, त्याला कळिकाळाची बाधा होत नाही। ध्यानाच्या उच्च अवस्थेत काळाचा रीघ, प्रवेश नाही, मृत्यु ला प्रवेश नाही, अखंड आनंदाचा तो प्रांत आहे। काळ सुध्दा थांबून जातो। काल हे एक द्रव्य आहे, काल कधीपासून सुरु झाला व कधीपर्यंत राहील हे कोणीच सांगू शकत नाही। परंतु, उपनिषदात असा मंत्र आहे, “अक्षरात् संजायते काल:।” कालाची उत्पत्ती सुध्दा ईश्वरा नंतरची आहे। “काल: कलयतामस्मि।” काळ माझीच विभूती आहे असे भगव्द्गीतेत आहे। काल ईश्वराचेच स्वरुप आहे। रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप-
रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप । पापाचे कळप पळती पुढें ॥२॥ राम कृष्ण नामजपाने इतके पुण्य होते की मोजता येत नाही। अनंत तप केले, अनंत तप केल्याच्या राशी तयार होतात। आणि त्यामुळे पापाचे कळप च्या कळप पुढे पळतात, नष्ट होतात।
हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तयां मोक्ष ॥३॥ हरि हरि हा सामान्य मंत्र नाही, हा भगवान शिवाचा मंत्र आहे। जे या मंत्राचा अखंड जप करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो।
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निज स्थान ॥ ४ ॥ हरि, नारायण ही एकाच देवाची नावे आहेत। ज्ञानेश्वर महाराज म्हणत्षात, हरि, किंवा नारायण नामाचा पाठ, पुन्हा पुन्हा उच्चार, नामजप केला असता उत्तम स्थान, परमगती प्राप्त होते।
[07-12-2023]
