
ओझर: दि.१० वार्ताहर
येथील ‘मविप्र’ संचलित बोरस्ते विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी केले. प्रास्ताविक शिक्षिका शितल हांडोरे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी सावित्रीबाई फुले व साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या कार्याचा गौरव करून स्मृतिदिनी अभिवादन केले. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे महेश पिंगळ आत्माराम शिंदे बाबासाहेब गायकवाड शिवाजी सोनवणे हेमंत भट्ट बाबासाहेब लभडे प्रभाकर लवांड दादासाहेब सोनवणे महेंद्र डांगळे भाऊसाहेब रौंदळ बाळासाहेब मोरे बच्छाव मोहन क्षीरसागर मेघा शेजवळ कीर्ती बच्छाव रेखा देशमाने मंगल सावंत सरोज खालकर शकुंतला आगळे,. मनीषा पवार आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. फलकलेखन सविता पवार मोनाली निकम यांनी केले. सूत्रसंचालन शितल हांडोरे यांनी केले. आभार क्रीडा शिक्षिका मनोरमा सोमवंशी यांनी मानले.
