
मुळडोंगरी ( प्रतिनिधी ) सरस्वती माध्यमिक विद्यालय मुळडोंगरी येथे, जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक ,अध्यक्ष मान. श्री एस.जी. राठोड साहेब व सचिव सिद्धांत दादा राठोड यांच्या अध्यक्षतेखाली व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ बोरसे एस. एस. मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रथमतः सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व भारत माता,राजमाता जिजाऊ ,अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. महिला दिनानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध प्रेरणादायी भाषण भाषणातून मनोगत व्यक्त केले.तसेच उपशिक्षका श्रीमती अहिरे मॅडम यांनी महिलांच्या कर्तृत्वाबद्दल मार्गदर्शन केले व त्यावर प्रकाशझोत टाकला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना महिलांच्या कर्तुत्वाची व योगदानाची जाणीव झाली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
