
नाशिक (प्रतिनिधी)= गेल्या तीन वर्षातील प्रलंबित शिष्यवृत्ती, वैद्यकीय बिल, अनुकंपा मान्यता व इतर मान्यता प्रस्ताव इत्यादी ज्वलंत प्रश्न समाज कल्याण च्या आश्रम शाळांमध्ये निर्माण झालेले आहेत .राज्य उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली, विनोद हिरे राजेंद्र सोमवंशी यांच्या समवेत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.विविध प्रश्नांसाठी आज उपसंचालक श्री.वीर साहेब यांना निवेदन देण्यात आले. यासाठी दहा दिवसाची मुदत देण्यात आली असून शिक्षक आमदार किशोर दराडे यांचे उपस्थितीत (शिक्षक दरबार) सहविचार सभा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
