
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२०० वा दिवस
एकाग्रता सर्व ज्ञानाचे सार आहे. त्याच्याशिवाय काहीच केले जाऊ शकत नाही. सामान्य माणूस त्याच्या विचारशक्तीच्या ९० टक्के भाग व्यर्थ घालवित असतो आणि त्यामुळेच तो सतत मोठ्या चुका करीत असतो. प्रशिक्षित मनुष्य किंवा मन कधीच कोणती चूक करीत नाही. जेव्हा मन एकाग्र होते आणि मागे वळून स्वतःवरच केंद्रित केले जाते तेव्हा आपल्या आतमध्ये जे काही आहे ते आपले मालक न राहता गुलाम होते. ज्ञान मिळविण्याचा एकमेव उपाय आहे तो म्हणजे एकाग्रता. रसायनशास्त्रातील विद्वान आपल्या प्रयोगशाळेत जाऊन मनातील सगळ्या शक्तींना केंद्रीभूत करून ज्या वस्तूंचे विश्लेषण करतो, त्यावर प्रयोग करतो आणि अशाप्रकारे त्याचे रहस्य जाणून घेतो. तुम्ही लोक माझे बोलणे ऐकत आहात आणि तुम्ही जेवढे या विषयाशी एकाग्र व्हाल तेवढ्या स्पष्टपणे माझे म्हणणे समजू शकाल.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर फाल्गुन १४ शके १९४७
★ फाल्गुन वद्य /कृष्ण २
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. ५ मार्च २०२६
★ १५१२ भूगोलतज्ञ, गणितज्ञ, तत्वज्ञ, नकाशाकार गेरहार्ट मरकेटर यांचा जन्मदिन.
★ १९१३ किराणा घराण्याच्या सुप्रसिध्द शास्त्रीय गायिका गंगूबाई हनगळ यांचा जन्मदिन.
विवेकानंदांचे जाज्वल्य, प्रेरणादायी व अनुकरणीय असे मनुष्य निर्माणाचे व राष्ट्राच्या पुनरुत्थानाचे विचार नियमित व अखंडितपणे गत नऊ वर्षांपासून (३१ मे २०१७) पासून आपल्या पर्यंत पोहचविण्याचा सातत्यपूर्ण संकल्पाचा ३२०० वा दिवस आहे. ११ वा जागतिक विक्रम नोंदविला गेला आहे. हे वैचारिक अग्नीहोत्र असेच सतत तेवत रहावे यासाठी ठाकूरांच्या, स्वामीजींच्या चरणी प्रार्थना व आपल्या सर्वांच्या शुभाशिर्वादाची अपेक्षा…
प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे विवेकानंद विचारदूत 9921976422
