
मराठा विद्या प्रसारक समाजाचे आदरणीय सरचिटणीस मा. नितीनजी ठाकरे आणि नांदगाव तालुका संचालक मा. इंजि. अमित उमेदसिंग बोरसे (पाटील) यांच्या प्रेरणेतुन, मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नांदगाव आणि CII – मॉडेल करिअर सेंटर (MCC) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी, ५ मार्च २०२६ रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी ०२:०० वाजेपर्यंत एका भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात ३० हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार असून विविध क्षेत्रांतील ७०० पेक्षा जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांना तत्काळ नियुक्ती पत्र दिले जाणार आहे. या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संचालक मा. इंजि. अमित उमेदसिंग बोरसे (पाटील) आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एन. यु. पाटील यांनी केले आहे.
