
सिन्नर (प्रतिनिधी)
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही अभिमानास्पद बाब आहे परंतु मराठी भाषा समृद्ध करून तिचे जतन व संवर्धन करणे आपली सामूहिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळाचे व्याख्याते डॉ.श्यामसुंदर झळके यांनी केले. धोंडविरनगर (सिन्नर) येथील सॅक्रेड हार्ट पब्लिक(इंग्लिश मिडीयम) स्कूल येथे आयोजित मराठीभाषा गौरवदिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन घडविले.यावेळी ” गर्जा महाराष्ट्र माझा” या गीतावर विद्यार्थी, विद्यार्थीनींनी सामूहिक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन केल्याबद्दल डॉ.झळके यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत तसेच दीपप्रज्वलनाने झाली.पब्लिक स्कूलचे प्राचार्य फादर जिलेश यांनी स्वागत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीरश्री देशमुख , आराध्या घुले यांनी केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी रोशनी परदेशी, श्वेता जाधव, दाक्षायणी नागुरे,वृषाली सोनवणे,कविता कुटे,संदीप बागुल यांनी प्रयत्न केले.यावेळी स्कूलचे उपप्राचार्य फादर अबिन, फादर अनिल उपस्थित होते.
