उद्योजिका चारुलता (सोनू दीदी) पुरोहित


जेष्ठ साहित्यिका प्रा. विजया मारोतकर
पुणे ( प्रा. सविता इंगळे) स्वयंसिध्दा प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड, पुणे तर्फे 2026 चा स्वयंसिद्धा पुरस्कार हा जेष्ठ साहित्यिका प्रा. विजया मारोतकर व उद्योजिका चारुलता (सोनू दीदी) पुरोहित यांना जाहीर झाला आहे. विजाताई मारोतकर या नागपूरच्या ज्येष्ठ साहित्यिका असून त्यांचा ‘पोरी जरा जपून’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेर व परदेशात गाजत आहे. माय मराठी प्रतिष्ठान नागपूर व विदर्भ लेखिकाच्या त्या अध्यक्षा आहेत. तसेच चारुलता (सोनू दीदी) पुरोहित या पुण्यातील श्री महालक्ष्मी कॅटररच्या सर्वेसर्वा आहेत. कमी वयातच त्यांनी उद्योग क्षेत्रात मोठी भरारी घेतली असून अनेक सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. अशी माहिती स्वयंसिद्धाच्या अध्यक्षा सविता इंगळे यांनी दिली.
