
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१९७ वा दिवस
एकमेव परमेश्वर सत्य आहे एकमेव आत्मा सत्य आहे आणि एकमेव धर्म सत्य आहे. फक्त यांना सत्य समजा तुम्ही जर प्रलोभनांना ठोकर मारून सत्याचे सेवक झालात तर तुमच्यात अशी दैवी शक्ती येते की लोक तुमच्यासमोर येऊन अशा गोष्टी करायला घाबरतात ज्या तुम्हाला सत्य वाटत नाहीत, हे नक्की समजा. कोणताही खंड न पडू देता तुम्ही सलग १४ वर्षे सत्याची सेवा करू शकलात तर तुम्ही जे काही म्हणाल त्यावर लोक विश्वास ठेवतील. तेव्हा तुम्ही लोकांवर खूप उपकार करू शकाल. त्यांच्या गुलामीच्या बेड्या तोडू शकाल आणि राष्ट्राची प्रगती करू शकाल.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर फाल्गुन ११ शके १९४७
★ फाल्गुन शुध्द /शुक्ल १४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. २ मार्च २०२६ ★ हुताशनी पौर्णिमा होळी
★ १७०० – छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे सुपुत्र राजाराम महाराज यांचा स्मृतिदिन.
★ १९३१ सुप्रसिध्द मराठी साहित्यीक, वक्ते राम बाळकृष्ण शेवाळकर यांचा जन्मदिन.
★ १९४९ – सुप्रसिद्ध कवयित्री, स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी नेत्या, संयुक्त प्रांताच्या पहिल्या महिला गव्हर्नर सरोजिनी नायडू यांचा स्मृतिदिन.
★ होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दुःख, दारिद्र्य, आळस, द्वेष, मत्सर यांचे दहन होवो.
★ हुताशनी पौर्णिमा होळी, शिमगा सणाच्या हार्दिक शुभेच्छा.
