
सिन्नर (प्रतिनिधी)५ एप्रिल २०२५ सिन्नर येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड च्या वतीने अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास व सम्राट अशोक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले* सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान सम्राट होते. भारताच्या इतिहासात महान व शक्तिशाली सम्राट म्हणून स्थान दिले आहे. प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी हे भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले अशाच महान सम्राटांना दिली जाते. सम्राट अशोकांना ‘चक्रवर्ती सम्राट’ असे म्हणतात, चक्रवर्ती सम्राट म्हणजे ‘ प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील सम्राट अशोक हेच असे पहिले आणि शेवटचे महान चक्रवर्ती सम्राट झाले असे सम्राट अशोक आपल्या आयुष्यात एक ही युद्ध हरले नाहीत. कलिंगाच्या युद्धातील महासंहारानंतर कलिंग काबीज झाला, जे कोणत्याही मौर्य राज्यकर्त्यास पूर्वी जमले नव्हते. त्यांच्या राज्याचे केंद्रस्थान ज्याला . . कलिंगाच्या युद्धात झालेल्या मनुष्यहानी पाहून त्यांनी प्रचलित वैदिक परंपरा झुगारून हिंसेचा त्याग केला

आणि मानवतावादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला व नंतरच्या आयुष्यात त्यांनी स्वतःला बौद्ध धर्माच्या प्रसारास समर्पित केले. सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म संपूर्ण आशिया खंडात तसेच इतर प्रत्येक खंडात पसरवला होता. अशोकांच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या काना कोपऱ्यात सापडतात अशा महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांना विनम्र अभिवादन यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे, विजय मुठे,यांनी आपले मनोगत व्यक्त केलेतसेच या कार्यक्रमाचे सुञसंचलन राहुल जाधव यांनी केले व प्रास्ताविक विजय मुठे तर आभार किशोर शिंन्दे यांनी मानले या प्रसंगी महामित्र दत्ता वायचळे,आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे,राहुल जाधव, महिंद्र पठारे,सागर उडवणे, किशोर शिंन्दे,भाऊसाहेब चव्हाणके धोंडिराम जगताप आदि उपस्थित होते
