
नाशिक: ( वार्ताहर ) मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय खेडगाव येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी आदर्श इंग्लिश मीडियमचे अध्यक्ष जयराम डोखळे होते. प्रमुख अतिथी म्हणून मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर दिंडोरी पेठ संचालक आदरणीय प्रविण जाधव माजी मविप्र संचालक खेडगाव सरपंच आदरणीय दत्तात्रेय पाटील होते. मविप्र ही लोकांच्या विश्वासाला उतरलेली संस्था आहे अलीकडे झपाट्याने विद्यार्थी संख्या कमी होत असताना मागील शैक्षणिक वर्षात मात्र या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचे चित्र दिसून आले. हा आपल्या संस्थेवरचा पालकांचा व लोकांचा विश्वास आहे त्याला आपण तडा जाऊ देता कामा नये असे आवाहन करून व्यावसायिक शिक्षणाकडे लक्ष देण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची नितांत गरज आहे असे प्रतिपादन यावेळी मविप्र सभापती आदरणीय बाळासाहे क्षीरसागर यांनी केले. यशस्वी विद्यार्थ्यांनी उत्तरोत्तर आपली प्रगती साधावी असे सांगितले. प्रमुख अतिथी संचालक प्रवीण जाधव यांनी संघर्ष हा जीवनाचा भाग आहे संघर्षाशिवाय यशाचा दरवाजा खुलत नाही म्हणूनच विद्यार्थी जीवनातील काही वर्ष प्रचंड मेहनत करा आणि पुढील जीवन सुखी करा जीवनात नेहमी चिंतन करा आज कष्ट करा आणि पुढील जीवन सुरक्षित करा. विद्यार्थ्यांना सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगती करण्याची भरीव संधी आहे ही संधी आपण दवडता कामा नये. वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी होऊन आपल्या मातृभूमीची सेवा करण्याची संधी आपल्याला आहे. मातृभूमीच्या ऋणातून मुक्त होण्याची संधी दवडू नका. यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन पण जे यशस्वी झाले नाही त्यांचेही मी अभिनंदन करतो कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते यावर्षी नाही तर पुढील वर्षी तुम्ही नक्कीच व्यासपीठावर पारितोषिक प्राप्त करणार आहात. म्हणून आजच त्यासाठी मेहनत करायला सुरुवात करावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विविध स्पर्धांमध्ये सुयश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य आर आर शिंदे यांनी करून शैक्षणिक वर्षातील विद्यालयाच्या उपलब्धीचा आढावा यावेळी त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून घेतला. प्रमुख पाहुणे म्हणून अभिनव बाल विकास मंदिर अध्यक्ष सोमनाथ ठुबे मविप्र जेष्ठ सभासद सिताराम जाधव शामराव रणदिवे पत्रकार उत्तमराव जाधव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मराठी आणि विज्ञान हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कार प्राप्त शिक्षिका श्रीमती आढाव नागपुरे शिंदे वाजे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक के आर आहेर पर्यवेक्षिका के सी खेलुकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन उपशिक्षक एस एल कड उपशिक्षिका पी सी गांगुर्डे यांनी केले.
