
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८६८ वा दिवस स्वतःच्या तन-मन-धन व जीवनाचे समर्पण करून असा सेतू बांधा की ज्यावरुन लक्षावधी लोक सहज भवसागर पार करतील. सर्व शुभशक्ती संघटित करा. श्रेयाची अपेक्षा करू नका. ज्या ध्वजाला तुम्ही अनुसरत असाल तो कोणत्या रंगाचा आहे याची चिंता करू नका. सर्व रंगांच्या संगमातून शुभ्रतेचा, प्रीतीचा एकच एक रंग, एकच दिव्यद्युती निर्माण होऊ द्या! जीव ओतून आपण केवळ काम करायचे आहे. फळाची चिंता करायची नाही, ते आपोआपच प्रकट होईल. स्वामी विवेकानंद.. *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर १६ चैत्र शके १९४७*
★ चैत्र शुद्ध /शुक्ल ९
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. ६ एप्रिल २०२५ ★ श्रीराम नवमी.
★ समर्थ रामदास स्वामी जयंती
★ राम नवमी उत्सव शिर्डी
★ राम नवमी उत्सव शेगाव
★ १९३० प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.
★ १९८० भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पहिले अध्यक्ष झाले.
★ १९८३ भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्मविभूषण जनरल जयंतोनाथ चौधरी यांचा स्मृतिदिन.★रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे।रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम:।रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोSस्म्यहम्।रामे चित्तलय:सदा भवतु मे भो राम मामुद्धर॥३७॥
★ श्रीराम जन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा★ श्रीराम, जयराम, जय जय राम 🕉️
