
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
साहित्य क्षेत्रात नावलौकिक प्राप्त झालेल्या साप्ताहिक आम्ही मुंबईकर व्दारा साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांसाठी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे, रविवार दिनांक ८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १ वाजेपर्यंत पुणे येथील काकडे देशमुख शिक्षण संस्थेचे उत्कर्ष इंग्लिश मिडीयम स्कूल, कात्रज कोंढवा रोड, उत्कर्ष सोसायटी,तलावासमोर पुणे या ठिकाणी सदर पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे, या कार्यक्रमाचे उद्घाटक सौ.वसुधा नाईक, शिक्षिका, साहित्यिका, समाज सेविका, अध्यक्ष शरदचंद्र काकडे देशमुख, काकडे देशमुख शिक्षण संस्था, साहित्यिक, नाट्य अभिनेते, प्रमुख पाहुणे निलेश दातार, मुंबई नाट्य व चित्रपट अभिनेते, प्रिया दामले तितिक्षा इंटरनॅशनल संस्थापक, पुणे नाट्य कलाकार, आणि ज्येष्ठ साहित्यिक, गीतकार सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम उपस्थित असतील, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैल सुतार,युवराज्ञी अनुत्तरा,दिपक सोनवणे करणार आहेत, प्रमोद सूर्यवंशी, योगिता कोठेकर, योगेश हरणे, गौरव पुंडे,अंगद दराडे, श्री राम घडे, या मान्यवरांनी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे,या पुरस्कार सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी साप्ताहिक आम्ही मुंबईकर व्दारा साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांसाठी निःशुल्क पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते, या मुळे पुरस्कारार्थीना प्रेरणा मिळते, साहित्यिकांच्या साहित्याला आम्ही मुंबईकर मधून प्रसिद्धी देऊन साहित्यिकांना प्रोत्साहन दिले जाते,
