
नांदगाव: (मारुती जगधने) रामनवमी, हनुमान जयंती व भगवान महावीर जयंती – शांतता समिती बैठक वृत्तांतशहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्थानिक नांदगाव पोलिस ठाण्याच्या वतीने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक आगामी रामनवमी (राम जन्मोत्सव), हनुमान जयंती व भगवान महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली होती.बैठकीस पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी, उपनिरीक्षक , शांतता समितीचे सदस्य, विविध धर्मीय मंडळांचे पदाधिकारी, तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व सण शांततेत आणि सर्वसमावेशक वातावरणात साजरे व्हावेत यासाठी काही महत्वाचे सूचना देण्यात आले.

मिरवणुकीचे मार्ग निश्चिती – रामनवमी व हनुमान जयंतीच्या मिरवणुकांसाठी निश्चित मार्ग आखण्यात आले असून, कोणत्याही वादग्रस्त ठिकाणी बदल करण्यात आला आहे.ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण – ठरवलेल्या वेळेनंतर ध्वनीवर्धकांचा वापर होणार नाही. सर्व मंडळांनी याचे पालन करण्याचे आश्वासन दिले.सीसीटीव्ही व पोलीस बंदोबस्त – महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येईल.सर्व धर्मीय समन्वय – सर्व धर्मीय सण एकमेकांच्या भावना लक्षात घेऊन साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले.वाहतूक व्यवस्था – मिरवणूक दरम्यान वाहतुकीस अडथळा होणार नाही, यासाठी विशेष वाहतूक आराखडा तयार करण्यात येणार आहे.शेवटी, शांतता समितीच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले की, कोणतीही अफवा न पसरवता सर्व सण आनंदाने आणि सलोख्याने साजरे करावे असे आवाहन बैठकीत करण्यात आले. सदर बैठकीस विविध मंडळाचे पदाधिकारी सदस्य ॳॅडहोकेट, पत्रकार, पोलीस आजी-माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
