
ह.भ.प.नामदेव महाराज डोळस, नांदुरवैदय,ता.ईगतपुर
नाशिक जिल्हा प्रतिनिधी-नवनाथ अर्जुन गायकर यांजकडुन-
माणसाच्या आयुष्यात त्याच्या वाट्याला आलेली प्रतिकुलता त्याची प्रेरणा ठरू शकते. मात्र त्यासाठी हवी जिद्द,चिकाटी अन निष्ठा.
आदरणीय नामदेव महाराज माफी मागून उल्लेख करतो.आपण ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात, तो आपला बहुदा मारून खाणारा वर्ग जास्त मात्र आपण वेगळी वाट धरली, वेगळा मार्ग धरला. मारून खाण्यापेक्षा पेरून खावं हा मूलमंत्र जपला अन त्यामार्गाने मार्गक्रमण करून,समाजापुढं आदर्श ठेवला.
नांदूरचे वारकरी संप्रदायातील मर्मज्ञ मा.पुंजाबाबा मुसळे यांच्या हाताखाली बालपण घालवताना ,योग्य वेळी मा.मनोहर महाराज सायखेडे यांच्या सोबत आळंदीची वाट धरली अन आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार ठरला.आज इतक्या कमी वयात आपण इगतपुरी तालुक्यात ” गरूडपुराणाचार्य ” ही समाज मान्यता मिळवली,हे काही सहज होत नाही.
कीर्तन,प्रवचन, भजन,करतांना भागवत,रामायण,गाथा, ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथांचा सूक्ष्म अभ्यास,अन पारायण करतांनाच आपण ” गरूडपुराण ” समाजाला सांगतांना समाजातील लोकांना जन्म-मृत्यू ,अन त्यातील जीवन समजावून सांगत-सांगत ह्या ग्रंथातील आपण एक निष्णात झालात,ती आपली स्पेशालिटी झाली हे काही सहजच होत नाही.अन जेंव्हा समाज आपल्याला ” गरूडपुराणाचार्य ” म्हणून समजतो, तसा आपला उल्लेख केला जातो.
आळंदी मध्ये जोग महाराज शिक्षण संस्थेत आदरणीय ह. भ. प. संदीपान महाराज शिंदे यांच्या सारख्या महात्म्याकडून आपणांस व मा. मनोहर महाराज सायखेडे यांना वारकरी शिक्षणाचे धडे गिरविण्याचं भाग्य मिळालं तेंव्हा ही बाब गावाला सुद्धा अभिमानाची निश्चितच आहे.
नांदूर च्या भूमीत ज्या-ज्या महोदयांनी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेतली,अन ती उत्तमप्रकारे जपण्याचा त्यांचा प्रयत्न आहे,त्या सर्वांचं कार्य हेवा वाटावा असंच आहे,अन ते यापुढेही राहो.
आज आपण ज्या वारकरी संप्रदायाचं पवित्र काम करता आहात,त्यामध्ये आर्थिक बजबजपुरी बोकाळली आहे,मात्र आपण पैसा सर्वस्व न मानता कार्यरत आहात.
आपणास जन्मदिनी खुप खुप शुभेच्छा.पांडुरंग आपणास उदंड आयु आरोग्य देवो.
लेखन- विठोबा दिवटे
