
. **सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१९२ वा दिवस*
हिंदूंच्या दृष्टीने जगातील सर्व धर्म म्हणजे जगातील वेगवेगळ्या काळातील स्त्री पुरुषांच्या गरजेनुसार तयार झालेले आणि थोडे वेगळे वाटणारे असले तरीही शेवटी सर्वांचा उद्देश एकच आहे तो म्हणजे प्रगती वा विकास. प्रत्येक धर्माने जडत्व असलेल्या माणसांपासूनच एक देव निर्माण केला असून तोच देव त्या सर्वांचे प्रेरणास्थान आहे. तरीही मग यामध्ये इतका परस्पर विरोध का आहे. हा विरोध फक्त आभासी स्वरूपाचा आहे असे हिंदूंचे म्हणणे आहे या सर्वांची उत्पत्ती निरनिराळ्या अवस्थांमध्ये आणि निसर्गानुसार आवश्यकतेनुसार झालेली असली तरी त्या सर्वांचे मूळ सत्य हे एकच आहे.
*स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर फाल्गुन ६ शके १९४७*
★ फाल्गुन शुध्द /शुक्ल ९
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. २५ फेब्रुवारी २०२६ ★ १८४० बाल मनाचा विचार मांडणारे लेख, कविता, निबंध, शास्त्रीय विषयसंग्रहांचे लेखक, बालवाड्मयकार, ‘बालबोध’ मासिकाचे लेखक विनायक कोंडदेव ओक यांचा जन्मदिन.
