
नासिक-( प्रतिनिधी )प.पु श्री गोविन्द गिरिजी महाराज याच्या आशीर्वादाने व आ.प्रमिला जीजी यांच्या मार्गदर्शनाने गीता परिवार, नाशिक व ग्रामोदय प्राथामिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 14 फेब्रुवारी या दिवशी मातृ पितृ दिन अतिशय उत्साहात व आनंदात संपन्न झाला.
शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती उज्वला भिकाजीं देसले व श्रीमती अलका रघुनाथ येवले यांनीही गीता परिवाराच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
मुले व मुलींनी मातृ पितृ पुजन केले व आई वडीलांनी त्यांना आशिर्वाद दिले.

या स्तुत्य उपक्रमाचे
या प्रसंगी कांही पालक मनोगत व्यक्त करताना भावविवश होऊन त्यांना अश्रू अनावर झाले.
“मातृ पितृ आदराची व वसंसकाराची सध्या नितांत गरज असा. आमच्या मुलांसाठी तुम्ही नेहमी असे उपक्रम करत जा अशी विनंती केली”
सुंदर असा संस्कारक्षम कार्यक्रम यशस्वी करणेसाठी शैलजा ब्राह्मणकर, प्रदिप ब्राह्मणकर,शाळेतील शिक्षक येवले मॅडम, निकम मॅडम,निरंतर मॅडम सहकारी
यांनी
विशेष परिश्रम घेतले व
गीता परिवाराचे आभार मानले.
