
नांदगाव( प्रतिनिधी) येथील बाजार समितीच्या धान्य शेड मधून व्यापारी गोविंद अग्रवाल यांनी स्कुटीच्या डिक्कीत ठेवलेले पाच लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लांबविले. अग्रवाल यांनी शेतकऱ्यांना पैसे वाटप करायचे असल्याने बँकेतून पाच लाख आणले होते ते स्कुटीच्या
डीपी ठेवून त्यांनी स्कुटी धान्य शेडच्या बाजूला लावली.व ते शेडमध्ये हिशोबाचे पुस्तक आणायला गेले असता पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी डिक्कीचा लाॅक तोडून पिशवीत ठेवलेले पाच लाख रुपयांची रोकड लांबवीली. या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
