
ओझर: ( वार्ताहर )येथील ‘मविप्र’ संचालित माधवराव बोरस्ते विद्यालयात- *प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय माउंट आबू* संचलित राणेनगर नाशिक सेंटरच्या ब्रह्माकुमारी उज्वला दीदी यांचे माधवराव बोरस्ते विद्यालयात *ताण- तणाव विरहित जीवन व परीक्षेला सामोरे जाताना सकारात्मक दृष्टिकोन* या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. व्याख्यानात परीक्षेला सामोरे जाताना कसा सकारात्मक विचार करावा, त्याचबरोबर विवेकानंदांच्या गोष्टीतून आत्मा व परमात्म्याचा परिचय करून दिला. रागावर नियंत्रण कसे करावे,मेडिटेशनचे फायदे तसेच विद्यार्थ्यांनी आयुष्यभर वापरायची पंचसूत्री काकदृष्टी, बकध्यान,स्वाननिद्रा म्हणजे कमी झोप, मितआहारी, वधूत्यागी म्हणजेच ब्रह्मचर्येचे पालन करणे.हे व्याख्यानातून सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी व शिक्षक यांचे मेडिटेशन घेतले.

व्यासपीठावर उपमुख्याध्यापक धैर्यशील पाटील पर्यवेक्षक दशरथ शिंदे ज्येष्ठ शिक्षिका मंगल सावंत, सरोज खालकर, संगीता शेटे शिक्षक राजेंद्र शिंदे,दादासाहेब सोनवणे, आत्माराम शिंदे,नरेंद्र डेरले, मोहन क्षीरसागर क्रीडाशिक्षक प्रभाकर लवांड हेमंत भट आदी उपस्थित होते. याप्रसंगी ब्रह्माकुमारी उज्ज्वलादीदी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षिका सरोज खालकर यांनी केले.
