
मनमाड( प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक समाजाचे आदर्श इंग्लिश मेडिअम स्कूल च्या विदयार्थ्यांनी कायदा व सुव्यवस्था, गुन्हे रोखण्यासाठी,नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी अशा योग्य ठिकाण म्हणजे मनाड पोलीस स्टेशन/ठाणे मनमाड येथे भेट दिली. तेथे अनेक प्रकारे कामकाज करणारे विभाग – हेड कॉन्स्टेबल,सहाय्यक पोलीस निरीक्षक/ उपनिरीक्षक,पोलीस अधीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस ठाण्यातील विविध विभाग बघितले. तेथील कार्यरत पोलीस अधिकारी श्री. हेमंत भंगाळे, श्री. भरत जाधव,श्री. महेश देवकाते, श्रीमती. दिपाली आव्हाड ,श्रीमती.प्रतिक्षा पवार यांनी विद्यार्थ्यांना गुन्हांची नोंद -तपास,चोरी, अपघात,मारहान, दरोडा, खून ,हुंडाबळी आणि इतर गुन्हांची नोंद घेणे व तपासणी करणे याबाबत माहिती दिली.

. तातडीची मदतीसाठी किंवा तक्रार नोंदणी करण्यासाठी पोलीस स्टेशनशी साधता येतो. संपर्क ११२/१००/१०८/ इ. नंबर कशाप्रकारे उपयोग करता येईल ते स्पष्ट केले. गुन्हा शाखा, सायबर गुन्हा शाखा, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, महिला अत्याचार विरोधी कक्ष, समुपदेशन कक्ष,अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, गुन्हे प्रकटीकरण कक्ष, शस्ञास्ञसाठा कक्ष, गुन्हेगार कोठडी इ.तेथील कार्यरत ठिकाण बघितले.त्यानंतर जवळील न्यायालय येथे जाऊन तेथील प्रत्यक्षात न्यायालयीन कामकाज,विविध वकील, खटल्यांची सुनावणी, न्यायालयीन कक्ष,दिवाणी-फौजदारी कक्ष, बघितले व वर्गात कधीही शांत न बसणारे विद्यार्थ्यांना तेथील अप्रुप वाटले ते म्हणजे तेथील शांतता, अनेक लोक कामे करून ये- जा करत होती मात्र सर्व कारभार शांत व सुरळीत चालू होता.तेथील अँड. मोरे साहेबांनी विद्यार्थ्यांना छानच माहिती व मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना एक नवीन अनुभव या समक्ष भेटीमध्ये आला. व विद्यार्थ्यांनी त्यांचे ध्येय निश्चित केले. म. वि.प्र.नांदगाव संचालक श्री. अमितभाऊ बोरसे – पाटील यांनी उपक्रमभेटींचे भरभरून कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका शितल आहेर, सोबत शिक्षिका संपदा येणारे, एकता बोदडे, आम्रपाली मोरे उपस्थित होते.

