
मखमलाबाद विद्यालयात कर्मवीर डाॅ.वसंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करतांना मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे,शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष वाळू काकड, माजी मुख्याध्यापक अरूण पिंगळे,प्राचार्य संजय डेर्ले,उपमुख्याध्यापिका विमल रायते,ज्युनियर कॉलेज प्रमुख उज्वला देशमुख,जेष्ठ शिक्षक प्रताप काळे,अनिल पगार तसेच सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे मविप्र संस्थेचे माजी सरचिटणीस कर्मवीर डाॅ.वसंतराव पवार यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष वाळू काकड,माजी मुख्याध्यापक अरूण पिंगळे,प्राचार्य संजय डेर्ले, उपमुख्याध्यापिका विमल रायते, ज्युनियर कॉलेज प्रमुख उज्वला देशमुख यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.जेष्ठ शिक्षिका दिपाली कोल्हे यांनी कर्मवीर डाॅ. वसंतराव पवार यांचा जिवनपट मांडला

.”स्वप्न प्रत्यक्षात साकार करणारे भाग्यविधाते”,सर्जनशील नेतृत्व,चिंतनशिल व व्यासंगी शिक्षणतज्ञ,साहित्य संस्कृतीचे उपासक,”बहुजन हिताय बहुजन सुखाय” हे ब्रीद वाक्य प्रत्यक्षात साकार करणारे व्यक्तीमत्व,डाॅक्टर म्हणजे उघडं पुस्तक सहज वाचता येणार व बुडणाऱ्याला वाचविणार, मातृधर्मी,शैक्षणिक,सामाजिक, राजकीय,साहित्यिक व क्रिडा क्षेत्रात स्वतःची दमदार मोहोर वठविणारे गुणग्राहक म्हणजे डाॅ. वसंतराव पवार हे होत.अशा अनेक उपाधींनी व शब्द सुमनांजलींची उधळण करीत आपले भाषण केले.सुत्रसंचालन दिपाली कोल्हे यांनी केले.जेष्ठ शिक्षक अनिल पगार यांनी आभार मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
