
मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात कर्म डॉ वसंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्ताने विचार व्यक्त करताना संस्थेचे उपसभापती डी बी आण्णा मोगल,व्यासपीठावर प्राचार्य रायभान दवंगे व आदी
कसबे सुकेणे (प्रतिनिधी) ता 4- मविप्र संस्थेचे आधारस्तंभ स्व कर्म डॉ वसंतराव पवार यांनी संस्थेच्या माध्यमातून अनेकांना प्रेरणा देण्याचे काम केले म्हणूनच त्यांचा जन्मदिन संपूर्ण संस्थेमध्ये प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो असे प्रतिपादन संस्थेचे उपसभापती श्री डी बी अण्णा मोगल यांनी केले ते मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित कर्म डॉ वसंतराव पवार यांच्या जयंती प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे, प्रमुख अतिथी उपसभापती मोगल, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षक राजेश खताळ आदींच्या हस्ते कर्म डॉ पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी उपसभापती मोगल यांनी डॉ पवारांनी मविप्र संस्थेला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या रुग्णालयाच्या माध्यमातून मविप्र संस्था मापक दरामध्ये रुग्णांना सेवा पुरविते एखाद्या संस्थेला जिवंतपणे एखाद्या व्यक्तीचे नाव देणे म्हणजे त्या व्यक्तीचे खऱ्या अर्थाने कर्तुत्व सिद्ध होते हे अधोरेखित होते कर्म पवारांनी प्रत्येक क्षेत्रात मोठे योगदान दिले विशेषता वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांनी स्वतःला वाहून घेतले त्यांच्या कार्यकाळात संस्थेतील 70% शाखा उदयास आल्या त्यांनी अनेक क्षेत्रात प्रेरणा देण्याचे काम केले म्हणूनच त्यांचा जन्मदिन प्रेरणा दिन म्हणून साजरा होतो असे मत व्यक्त केले यावेळी विद्यार्थिनी कु वैष्णवी भंडारे, शिक्षक बाळासाहेब निफाडे, मुकुंद ताकाटे यांनी डॉक्टर पवारांच्या जीवन कार्याची ओळख करून दिली अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य रायभान दवंगे यांनी संस्थेला पडलेले गोड स्वप्न म्हणजे डॉक्टर पवार असा उल्लेख केला कार्यक्रमासाठी अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक राहुल मोगल, कॉलेज विभाग प्रमुख राजेंद्र धनवटे आदींसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते . सूत्रसंचालन कु इच्छा काळे हिने तर आभार कु रेवती तिडके हिने मानले
