
नांदगाव (प्रज्ञानंद जाधव तालुका प्रतिनिधी) नांदगाव येथील आठवले गटाच्या रिपाईच्या ढाण्या वाघाला नगरविकास राज्य मंत्री मिसाळ महोदयांनी दिल्या जन्म दिनाच्या पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा नांदगाव शहरात गोर गरीब जनतेच्या मदतीला क्षणाचा विलंब न करणारे तरुणाचे अशा स्थान असलेले व सामाजिक कार्य पार पाडून राजकीय क्षेत्रात आपली छाप टाकणारे या ढाण्या वाघाला मोठ्या प्रमाणावर चाहत्यांनी शुभेच्छाचा वर्षाव केला होता.

सविस्तर माहिती अशी की नांदगाव शहराचे रि.पा.ई आठवले गटाचे निष्ठावंत RPI चा ढाण्या वाघ,शहर प्रमुख महावीर (नानाजी) जाधव यांच्या अभिष्टचिंतन निमित्त नस्तनपुर येथे धावती भेट घेत नामदार सौ. माधुरी मिसाळ नगरविकास राज्य मंत्री यांच्या हस्ते महावीर जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या शहरातील अनेक राजकीय,पक्षाच्या प्रमुख मान्यवरांनी त्यांना जन्म दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या

तसेच नांदगाव तालुक्यातील अनेक भागातील तरुणांनी जेष्ठनी महिला मंडळानी त्यांच्या निवास स्थानी जाऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या यावेळी त्यांच्या चाहत्यांनी डीजेच्या ठेका धरतं नृत्य केले होते मंत्री मोहदया आले नंतरभाजपा चे नाशिक जिल्हा महामंत्री मा. संजय सानप यांनी महावीर (नानाजी) जाधव यांना पाचरण करून मंत्री महोदया मिसाळ यांची ओळख करुण दिली तसेच मंत्री महोदया यांनी रि.पा.ई.च्या ढाण्या वाघाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या होत्या महावीर जाधव यांनी सर्वांचे आभार मानले होते.
