
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१८५ वा दिवस
मी केवळ कामाकरताच काम करतो हे म्हणणे अगदी सोपे आहे. परंतु त्याच्यासारखे आचरणात असण्यास कठीण असे दुसरे काहीच नाही. असा मनुष्य म्हणजे कर्मयोगाचा चालता बोलता आदर्शच आहे. काहीतरी प्रेरणेशिवाय किंवा फलाच्या आशेशिवाय काम करणे अशक्यच असते. कामामागे काहीतरी इच्छा, हेतू असतेच. पैशाची नसेल तर सत्तेची इच्छा असते. सत्तेची नसेल तर आणखी कशाची तरी असेल पण कुठेतरी काहीतरी प्रेरणा असतेच फल आशा असतेच ही फलाशाच दुःखाला जन्म देते जेव्हा आपण स्वतःच्या मनाचे स्वामी बनतो तेव्हाच केलेले काम अनासक्त असते आणि ते श्रेष्ठ अशा आनंदाची प्राप्ती करून देते.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास २९ शके १९४७
★ फाल्गुन शुध्द /शुक्ल १
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. १८ फेब्रुवारी २०२६
★ १४८६ योगी चैतन्य महाप्रभू यांची जयंती
★ १८२३ रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ ’लोकहितवादी’ यांचा जन्मदिन
★ १८३६ स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांचा जन्मदिन
★ १८८३ क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांचा जन्मदिन.
