
ओझर: (वार्ताहर) येथील एसएससी परीक्षा मार्च 2026 केंद्र क्र 1430 ची सहविचार सभा केंद्राध्यक्ष सोपान वाटपाडे यांच्या अध्यक्षतेखाली ओझर येथील बोरस्ते विद्यालयात संपन्न झाली.
याप्रसंगी त्यांनी परीक्षेस सामोरे जाताना पर्यवेक्षकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. पेपर सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित रहावे. पर्यवेक्षण करताना आपापल्या परीक्षा हॉलमध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांचे परीक्षा रिसीट व आयकार्डची बारकाईने तपासणी करावी. शालेय प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांची नियमित झडती घ्यावी. अशा महत्त्वाच्या सूचना उपस्थित सर्व पर्यवेक्षकांना दिल्या.

व्यासपीठावर उपकेंद्राध्यक्ष उमेश कुलकर्णी उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
