
नांदगाव (प्रतिनिधी ) भारतीय जनता पार्टी नांदगाव मंडल च्या वतीने बुधवार दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त “समर्पण दिवस” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शनि मंदिर गार्डन, अहिल्यादेवी स्मारक, नांदगाव येथे सकाळी ११:०० वाजता संपन्न झाला

कार्यक्रमास भाजपच्या जेष्ठ नेत्या ॲड जयश्रीताई दौंड, सौ. ताराताई शर्मा, राजेंद्र गांगुर्डे, प्रदीप थोरात, अक्षदा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मार्गदर्शन करताना मान्यवरांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेली एकात्मक मानवतावादाची विचारसरणी व ‘अंत्योदय’ ही संकल्पना आजही तितकीच महत्त्वाची असल्याचे सांगितले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचे कार्य प्रत्येक कार्यकर्त्याने समर्पण भावनेतून करावे, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमासाठी मंडलातील सर्व पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, समिती सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन
मा.सतीश बाळासाहेब शिंदे,
मा .नारायण ( बबन ) जगन्नाथ मोरे
यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

अमर रहे अमर रहे पंडित दीनदयाल उपाध्यायया अमर रहे घोषणांनी परिसर दुमदुमला
या प्रसंगी सजन तात्या कवडे, गणेश शिंदे डॉ. राजेंद्र आहेर ,ॲड उमेश सरोदे दादाभाऊ बोरसे, रवी कवडे ,सतीश अहिरे डॉ. बीके आहेर ,अन्नपूर्णा ताई जोशी, दत्तू शेलार, प्रदीप शेलार, विवेक दौंड दिनेश जेजुरकर तात्यासाहेब घोटेकर ,फिरोज खाटीक ,गणेश शर्मा, अरुण पवार मनोहर निकम, माधव काजळे, सुनंदा वाघ व असंख्य कार्यकर्ते बंधू-भगिनी उपस्थित होते
