
वडांगळी( प्रतिनिधी). मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच अभिनव बाल विकास मंदिर वडांगळी या विद्यालयात मविप्र संस्थेचे आधारस्तंभ, माजी सरचिटणीस, डॉ. वसंतराव पवार साहेब यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार हे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक मच्छिंद्र धातडक, रवींद्र हांडगे, बाळासाहेब आडसरे, सुभाषराव ठोक, मोहिनी क्षीरसागर, स्मिता वाघ, सीमा भामरे, संदीप वारुंगसे, मनीषा आगळे, निशा राजेभोसले, विलास गोसावी, राजेंद्र गीते ,सचिन सानप, रामकृष्ण सानप, राहुल लोंढे, कैलास काळे, तुकाराम सानप, मधुकर बागुल ,दत्तात्रय पाचोरे ,उज्वला गांगुर्डे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार व पर्यवेक्षक मच्छिंद्र धातडक यांच्या शुभहस्ते डॉ. वसंतराव पवार साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

यावेळी रेहेनुमा शेख व धनश्री कोकाटे या विद्यार्थिनींनी डॉ.वसंतराव पवार साहेबांच्या कार्याचा आढावा आपल्या भाषणातून घेतला. अध्यक्ष स्थानावरून बोलताना मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार म्हणाले की डॉ. वसंतराव पवार साहेबांनी मविप्र संस्थेचे एका वटवृक्षात रूपांतर केले. आडगाव येथील मेडिकल कॉलेज उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीचा साहेबांनी संस्थेसाठी उपयोग करून संस्थेला खऱ्या अर्थाने प्रगतीपथावर आणले.संस्थेच्या अनेक शाखा त्यांनी सुरू करून त्यांनी संस्था नावारुपाला आणली.असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक शंकरराव सांगळे यांनी केले व आभार प्रदर्शन संदीपराव म्हस्के यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
