
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१७६ वा दिवस
जगातील महान दृष्टे, श्रेष्ठ प्रेषित आपल्या मुलांकडे वात्सल्याने पाहावे तसे जगाकडे पाहत. त्यांची ती जागा प्रेमशक्ती धर्मांधाच्या ध्यानी आली नाही. त्यांचे हृदय अथांग करुणेने आणि तितिक्षेने भरलेले असल्याने, प्रेमळ पिता मुलांचे अपराध जसे सोसतो तसे त्यांनी जगाचे सारे अपराध सोसले. मानवी समाजाची प्रगती कशी व्हायला हवी याचे स्पष्ट चित्र त्यांच्या डोळ्यापुढे होते. शांतपणे, धीराने त्यांची उपाययोजना चाललेली होती. कुणाला शिव्याशाप न देता, कुणाला भय न दाखवता ऋजुतेने, प्रेमाने त्यांनी आपल्याला एक एक पाऊल पुढे नेले. परमेश्वराविषयीच्या जुन्या प्रचलित कल्पना या तत्कालीन विकसित नितीनियमांशी जुळणाऱ्या नव्हत्या हे त्यांना कळत होते. मात्र नव्याला जुन्याशी बांधणारा परंपरेचा धागा तोडून टाकला तर नवसमाजरचनेची सारी स्वप्ने फोल होतील. त्या धाग्यावाचून सारे मोती विसरून जातील.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास २० शके १९४७
★ माघ वद्य /कृष्ण ८
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. ९ फेब्रुवारी २०२६
★ १८९७ भारतीय कामगार चळवळीचे अर्धयु, ज्यांच्या प्रयत्नाने जगभरातील सर्वांना आठवड्यातील एक दिवस रविवारची हक्काची सुट्टी मिळाली असे नारायण मेघाजी लोखंडे यांचा स्मृतीदिन.
★ १९३३ साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना ‘श्यामची आई’ या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.
★ १९५१ स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू
★ २००८ कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचा स्मृतीदिन.
